Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ वादातून तरूणासह मित्रावर चाकूने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अजिंठा चौकातील एचपी पेट्रोल पंपासमोर नातेवाईकांसोबत झालेल्या वादावरून दोन जणांना मारहाण करून चाकूने वार करत दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेख अकबर शेख अब्बास (वय-३३) रा. अक्सा नगर, जळगाव हा तरूण रविवारी ३० जुलै रोजी रात्री ९ वाजता त्याचा मित्र शेख इम्रान शेख चांद याच्यासोबत उभा होता. त्यावेळी तंबापुर परिसरात राहणारा अरबाज शहा युसुफ शहा आणि त्याच्यासोबत नमीम असलेला तरुण आला. त्यामध्ये नातेवाईकांसोबत झालेल्या वादावरून शेख अकबर शेख अब्बास याच्या डोक्याच्या मागे चाकूने वार करून दुखापत केली. तसेच त्याचा मित्र शेख इमरान याला देखील मारहाण करून दुखापत केली व पसार झाले. ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या शेख अकबर शेख अब्बास याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेबाबत सोमवारी ३१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.

Exit mobile version