Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुप्रिम कॉलनीतील तरूणाची राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनीतील २० वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी २४ मार्च रोजी दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

कन्हैय्या किसन खासले (वय-२०) रा. सुप्रिम कॉलनी जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.  आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही.

याबाबत माहिती अशी की, “कन्हैय्या खालसे हा पत्नीसह सुप्रिम कॉलनीत भाड्याच्या घरात वास्तव्याला आहे. हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी २४ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास कन्हैय्याची पत्नी हे घराबाहेर कामानिमित्त गेल्यानंतर कन्हैय्या एकटाच होता. त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

पत्नी घरी आल्यावर पतीने गळफास घेतल्याचे दिसताच एकच आक्रोश केला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अडसुरे यांनी मयत घोषीत केले.”

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली. पुढील प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील आणि पोकॉ. डापकर हे करीत आहे.

Exit mobile version