Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धावत्या रेल्वेखाली आल्याने भादली येथील २७ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नशिराबाद ते तरसोद फाट्याजवळ गुरूवार २१ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. देवेंद रामकृष्ण कोल्हे वय २७ रा. भादली ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील भादली येथे देवेंद्र कोल्हे हा तरूण आपल्या आईवडील, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवार २० मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता गावात जावून येतो असे सांगून देवेंद्र हा घरातून निघून गेला होता. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गुरूवार २१ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद रेल्वे फाट्यादरम्यानच्या रेल्वे रूळावर त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. मयत तरूणाच्या पश्चात आई,वडील, पत्नी कोमल आणि दोन मुलं असा परिवार आहे.

Exit mobile version