Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धारदार शस्त्राने एका तरूणावर वार; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील एस.के. ऑईल मील परिसरात राहणाऱ्या तरूणाला काहीही कारण नसतांना एकाने दारूच्या नशेत शिवीगाळ व धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी २५ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, इकबाल दाऊ पटेल (वय-२८) रा. कानळदा रोड, जळगाव हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २४ जानेवारी रेाजी रात्री ८ वाजता तो त्याच्या (एमएच १९ डीएम ३६६५) क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात असतांना संशयित आरोपी भोपाली उर्फ विजय वसंत अहिरे रा. कानळदा रोड, जळगाव याने दारूच्या नशेत येवून शहरातील शिवाजी नगरातील एस.के. आईल मील जवळ  इकबाल पटेल याची दुचाकी आडविली व काहीही कारण नसतांना बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी इकबाल पटेल यांनी शहर पोलीस ठाण्यात रात्री १२ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भोपाली उर्फ विजय वसंत अहिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविंद पाटील करीत आहे.

 

 

Exit mobile version