Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेतातून बैलगाडी नेण्यावरून तरूणासह परिवाराला बेदम मारहाण

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातून बैलगाडी नेण्याच्या कारणावरून तरूणासह त्याच्या कुटुंबियांना सहा जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “चाळीसगाव शहरातील खडकी बायपास येथे राहणारा ज्ञानेश्वर मुरलीधर मांडोळ (वय*-२३) हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तो चालक असून शेतीदेखील करतो. रविवार, दि. ३ जुलै रोजी सायंकाळी ज्ञानेश्वर घरी असतांना त्याच भागातील रहिवाशी सचिन जनार्दन थोरकर, गणेश सुरेश शिंदे, मनोज सोपान गादीकर, विशाल माधवराव मांडोळे, जयश्री चुनीलाल थोरकर, माधवराव दौलत मांडोळे सर्व रा. खडकी बायपास यांनी शेतातून बैलगाडी का घेवून गेला या कारणावरून ज्ञानेश्वर मांडोळे याला बेदम मारहाण केली. यासह ज्ञानेश्वरचे काका भिमराव मांडोळे, काकू मिनाबाई मांडोळे, वडील मुरलीधर मांडोळे, आई छायाबाई मांडोळे, काका सतिश मांडोळे, काकू अरूणाबाई मांडोळे, भाऊ सचिन यांना लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली.

याप्रकरणी ज्ञानेश्वर मांडोळे याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सचिन जनार्दन थोरकर, गणेश सुरेश शिंदे, मनोज सोपान गादीकर, विशाल माधवराव मांडोळे, जयश्री चुनीलाल थोरकर, माधवराव दौलत मांडोळे सर्व रा. खडकी बायपास चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर सोनवणे करीत आहे.

Exit mobile version