Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गॅरेजवर काम करणाऱ्या कामगाराला धमकी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गाडी दुरूस्तीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून गॅरेजचे काम करणाऱ्या कामगाराला धमकी दिल्याचा प्रकार सामोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख वसीम शेख गफ्फार (वय-३८) रा. अपना वाईन समोर, गणेश कॉलनी,  जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेख वसीन यांचे शिव कॉलनीत दुचाकी दुरूस्ती करण्याचे गॅरेज दुकान आहे. दुचाकी दुरूस्ती करून मिळाल्या पैशातून आपली उपजीविका भागवतो. त्यांच्या दुकानासमोर दिपक गोरखनाथ देवरे (वय-४५) रा. शिवकॉलनी जळगाव याचे झेरॉक्स दुकान आहे. त्यांची दुचाकी दुरूस्तीसाठी शेख वसीम कडे दिली होती. दुचाकी दुरूस्ती करून दिपक देवरेला दिली. त्यानुसार शनिवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दुचाकी दुरूस्तीचे पैसे दिपक देवरे याच्याकडे मागितले. याचा राग आल्याने दिपकने पैसे न देला शेख वसीमला धमकी दिली. याबाबत शेख वसीम याने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दिपक देवरे याच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

Exit mobile version