Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाबळ परिसरातून लांबविली दुचाकी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहासमोरून महिलेची २० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, सरिता अजय खाटने (वय-५३) रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी ह्या महिला पत्रकार आहेत. ७ मार्च रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास सरिता खाटने ह्या दुचाकी (एमएच १९ बीव्ही ४४४७) ने महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे आल्या. दुचाकी बाहेरच पार्ककरून लावली होती. अवघ्या काही मिनीटातच अज्ञात चोरट्यांनी त्यांनी पार्क केलेली त्यांची २० हजार रूपये किंमतीचा दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कोठेही आढळून आली नाही. याप्रकरणी सोमवार १४ मार्च रोजी महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

Exit mobile version