Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मार्केटमधून महिलेची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गोलाणी मार्केट जवळील दत्त मंदिरासमोरून महिलेची दुचाकी अज्ञात चोरून नेल्याची घटना गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता उघडकीला आला आहे.  याबाबत रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की,  अलका श्रीधर भागवत वय-४७ रा. अयोध्या नगर, भुसावळ या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गुरूवार ३० नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता अलका भागवत या महिला त्यांची दुचाकी (एमएच १९ सीके  १८८०) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील दत्त मंदिराजवळ आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मंदिराच्या समोरच दुचाकी पार्क करून कामाच्या निमित्ताने निघून गेल्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. काम आटोपून परत आल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी दिसून आले नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी मिळाली नाही. अखेर रविवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बशीर तडवी हे करीत आहे.

Exit mobile version