Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्यावर दुचाकी घसरल्याने महिला गंभीर जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल-भुसावळ मार्गावरील शहरातील फालक नगर बस थांब्याजवळ एका दुचाकीचा तोल सुटल्याने अपघात होवून दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी, यावल ते भुसावळ मार्गावर असलेल्या यावल शहरातील फालक नगर बस थांब्याजवळ आज ११ मार्च रोजी सांयकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास विजय पाटील वय-५९ व मिनाक्षी विजय पाटील वय-५३ वर्ष दोघ राहणार भुसावळ हे दुचाकी क्रमांक एमएच १९ डीएस २८९४ ने सातोद हुन भुसावळकडे जात असतांना रस्त्यावर असलेला खड्डा चुकवितांना वाहनाचे नियंत्रण सुटल्याने मागे बसलेल्या महिला मिनाक्षी विजय पाटील खाली पडल्या. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. तर विजय पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.

दरम्यान अपघाताच्या ठीकाणापासुन जवळ असलेले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रितेश ( रॉकी ) पाटील, पक्षाचे कार्याध्यक्ष जितेन्द्र सोनवणे, राष्ट्रवादी पक्षाच्या सामाजिक व न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष विलास अडकमोल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रूग्णवाहिका बोलवून जखमी महीलेस तात्काळ उपचारासाठी यावल च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यास मदत केली. ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर प्राथमीक औषद्य उपचार करीत जखमी महिलेची प्रकृती ही अधिक गंभीर असल्याने त्यांना तात्काळ रूग्णवाहीकेव्दारे पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले.

Exit mobile version