Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर येथे अपघात; महिला जागीच ठार, पती जखमी

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील भोकरी फाट्यावर आज दुपारी ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने ३८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रावेर बऱ्हाणपूर रस्त्यावर भोकरी फाट्यावर घडली आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी आहे. 

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलाबाई सोपान शिरसाठ (वय ३८ रा. वखारी ता जि बऱ्हाणपूर) असे मृत महिलेचे नाव असून पति सोपान कडू शिरसाठ गंभीर जखमी आहे. ही घटना आज रविवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली. शिरसाठ हे पत्नीसह केऱ्हाळा खुर्द येथील आजीची तब्बेत खराब असल्याने भेट घेण्यासाठी शनिवारी आलेले होते. ते दुपारी दीड वाजता ते वखारी येथे मोटारसायकल क्रमांक-एम पी १२ एचडी ९१५८ ने जात असताना रावेरकडून बऱ्हाणपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक-एमपी ०७ एचबी  ३३७१ ने जोरदार धडक दिल्याने मंगलाबाई जागीच ठार झाली.  तर तिचा पती सोपान शिरसाठ हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत .त्यांना पुढील उपचारासाठी बऱ्हाणपूर येथे पाठविण्यात आले आहे. याबाबत येथील पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे .चालक रामप्रसाद जगडीशसिंग यादव रा गोरमी ता मेहेगव जि भिंड मध्यप्रदेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version