Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला तिघांकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अयोध्यानगरात राहणाऱ्या महिलेला जुन्या भांडणाच्या कारणावरून तिच्या नातेवाईकांतील तीन जणांनी शिवीगाळ करत लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी २६ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सविता गोपाल पाटील वय-२९ या महिला आपल्या परिवारासह अयोध्या नगरात वास्तव्याला आहे. शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेची चुलत नणंद ज्योती पाटील, चुलत नंदोई भाऊ आणि दीर नागेश्वर पाटील या तिघांनी शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने रविवारी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

Exit mobile version