Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कौटुंबिक वादातून महिलेला शिवीगाळ व मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल नजीकच्या नागोरी टी-पॉइंट जवळ एका कौटुंबिक वादातून महिलेला लोखंडी वस्तूने मारहाण करून दुखापत करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सोमवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी मंगळवारी १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कुसुम सुनील परदेशी (वय-४२, रा. छत्रपती शिवाजीनगर, जळगाव) या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महिला या शहरातील छत्रपती शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळील नागोरी टी पॉइंट जवळ आलेल्या होत्या. त्यावेळी कौटुंबिक वादातून संशयित आरोपी शांतीलाल रघुनाथ परदेशी रा. शिवाजीनगर याने महिलेच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या महिलेने मंगळवारी १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी शांतीलाल रघुनाथ परदेशी रा. छत्रपती शिवाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक अश्विनी इंगळे या करीत आहे.

Exit mobile version