Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाघझिरा येथील विषारी सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात पाठविले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा गावातीत राहणाऱ्या ४५ वर्षीय महीलेला सोमवार २४ जून रोजी शेतात काम करीत असतांना सर्पदंश झाल्याची घटना घडली असुन, महिलेला उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे .

या संदर्भात किनगाव आरोग्य केन्द्राच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मासुमबाई जुम्मा तडवी (वय ५०) वर्ष ही शेतमजुरी करणारी २४ जुन रोजी वाघझीरा शिवारातील त्यांच्या शेतात शेती कामास गेली असता, शेतात काम करीत असतांना देशातील सर्वात घातक व अतिश्य विषारी सापाने सर्पदंश केल्यामुळे महीलेची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती, सर्पदंश झाल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांच्या मदतीने सर्पदंश झालेल्या महिलेस तात्काळ किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रात दाखल केल्याने वैद्यकीय अधिकारी डाँ.तरन्नुम शेख यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करीत सर्पदंश झालेल्या महिला रूग्णाला हे इंजेक्शन दिले व औषधोपचार केल्यानंतर महिलेस पुढील उपचारासाठी जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात येथे पाठवीण्यात आले आहे.

सदर या महीलेला भारतातील सर्वात विषारी साप (रसल वायपर) ने दंश केला होता म्हणून महीलेची प्रक्रती गंभीर झाली होती. दरम्यान पावसाळा सुरू झाला असुन पावसाळ्यात सापांच्या बिड्यात पाणी जाते व साप बाहेर येतात व शेतात काम करीत असतांना किंवा गावातही सर्पदंश होण्याच्या घटना पावसाळ्यात जास्त घडतात तरी नागरीकांनी अश्या सर्पदंशाच्या घटना घडुनये म्हणून सावधगीरी बाळगावी व सर्पदंश झाल्यास तात्काळ रूग्णालयात यावे असे आवाहन परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांना किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डाँ.तरन्नुम शेख यांनी केले आहे.

 

Exit mobile version