Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महिला शेतकऱ्याला कारण नसतांना दोन जणाकडून मारहाण

पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील फत्तेपूर शिवारातील शेतात काहीही एक कारण नसताना एका महिला शेतकऱ्याला दोन जणांनी मारहाण विहिरीत फेकून देईल अशी देखील धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर शहरातील राहणाऱ्या वैशाली विशाल चौधरी (वय-५०) या आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात त्यांचे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर शिवारात शेत गट नंबर १७/२ मध्ये शेत आहे. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास वैशाली चौधरी या त्यांच्या शेतात काम करत असताना प्रदीप धनराज चौधरी आणि सुनीता प्रदीप चौधरी दोघे रा.फत्तेपूर ता.जामनेर हे त्या ठिकाणी आले व त्यांच्या शेतात काम करत असलेल्या शेतमजुरांना शेतातून हाकलून दिले. तसेच तुला तुझ्या शेतातील विहिरीत ढकलून देईल अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर वैशाली चौधरी यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार प्रदीप धनराज चौधरी आणि सुनीता प्रदीप चौधरी या दोघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version