Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाल्मीक नगरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाल्मीक नगरातून एकाची २५ हजार रूपये किंमतीची  दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र शामराव कोळी (वय-४३) रा. वाल्मिक नगर, आसोदा रोड जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ डीजे ६९६५) क्रमांकाची दुचाकी आहे. १९ जून रोजी रात्री १० वाजता त्यांनी वाल्मीक नगरातील पल्लवी किराणा दुकाना समोर त्यांची दुचाकी पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे २० जून रोजी पहाटे ५ वाजता उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून आले नाही. अखेर मंगळवारी २१ जून रोजी दुपारी २ वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदडे करीत आहे.

 

Exit mobile version