Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेल्वे स्टेशन परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी ।  जळगाव रेल्वे स्टेशन समोर पार्किंगला लावलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

अधिक माहिती अशी की, दिनेश अशोक जैसवाल (वय-३१) रा. अशोक नगर अयोध्या नगर हे कामाच्या निमित्ताने शनिवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी जळगाव रेल्वे स्थानकासमोर लावून कामानिमित्त निघून गेले. काम आटोपून रात्री ११ वाजता दुचाकीजवळ आले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. परिसरात शोध करून दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. दिनेश जैसवाल यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चंद्रकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version