Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे एकाची दुचाकी लांबविली; पोलीसात गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील इंदिरानगर भागात असणाऱ्या एका नोकरदाराची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विनोद सुभाषचंद्र संघवी (वय-50, रा. इंदिरानगर भडगावरोड पाचोरा) हे खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे कामावर जाण्यासाठी (एमएच 19 बीव्ही 6303) क्रमांकाची दुचाकी आहे. 1 मे रोजी रात्री 8 ते 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी विनोद संघवी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विनोद पाटील करीत आहे.

Exit mobile version