Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज । तालुक्यातील सडावण गावातील देवदत्त मंदिराजवळ गुरांची वाहतूक करणारा ट्रक अमळनेर पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर रोडवरील सडावण गावाच्या देवदत्त मंदिराजवळ अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक (एमएच ४१ जी २९६८) अमळनेर पोलिसांनी कारवाई करत शुक्रवारी १९ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता पकडला. यावेळी जातीचे १० गुरांची सुटका पोलिसांनी केली. या वाहतुकीबाबत चालक यांच्याकडे परवाना विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. दरम्यान या गुरांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक अरबाज खान आणि हर्षद खान अल्ताफ खान दोन्ही रा. मालेगाव यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहे.

Exit mobile version