Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांभोरी पुलाजवळ वाळूने भरलेला ट्रक पकडला

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी पुलाजवळून  वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धरणगाव पोलीसांनी कारवाई करत वाहन जप्त केल्याची कारवाई मंगळवारी १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास केली आहे. याप्रकरणी ट्रकचालक आणि मालक यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातून वाळू वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला  कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने मंगळवारी १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास कारवाई करत विना नंबरचे वाळूने भरलेला ट्रक पकडला. चालक पवन राजेंद्र ठाकरे वय ३२ रा.  अहुजा नगर, जळगाव याच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना आढळून आला नाही. पोलीसांनी वाळूने भरलेला ट्रक जप्त केला. याप्रकरणी पो.कॉ. पंकज शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक पंकज राजेंद्र ठाकरे आणि मालक राजेंद्र कावळे रा. जळगाव या दोघांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पाहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.

Exit mobile version