Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पशुखाद्याच्या नावाखाली दारू घेऊन जाणारा ट्रक पकडला

खामगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  पशुखाद्याच्या आड लाखो रुपयांची दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला ट्रकसह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

 

पशुखाद्याच्या आड दारू घेऊन जाणारा ट्रक मोठ्या सीताफिने पाठलाग करून टेंभुर्णा नजीक पकडण्यात आला आहे. या  ट्रकमध्ये पाच लाख रुपये किमतीचे दारूचे तब्बल ८००  बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून. ट्रकसह दारू साठा जमा करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातून एक ट्रक मोठ्या प्रमाणावर दारू घेऊन नागपूरकडे जात असल्याची गुप्त माहिती मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती.  यावरून मुंबई भरारी पथकाने बुलढाणा व खामगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोबत घेऊन. संयुक्त पथक तयार केले.  या पथकाने काल मध्यरात्री दोन वाजे दरम्यान पाठलाग करून ट्रक क्रमांक सीजी शून्य सात एव्ही ४४७६ ला टेंभुर्णा नदी पकडले. यावेळी ट्रकची झाडावरती घेतली असता मागे गेटवर काही कट्टे पशुखाद्य होते. तर त्यामागे दारूचे बॉक्स लपवन्यात आले होते .यावेळी हा ट्रक राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात आणण्यात आला.  दरम्यान,  आज सकाळी हा ट्रकमध्ये दारूसाठी बाहेर काढण्यात आला असता. यात तब्बल ८००  बॉक्स दारू मिळून आली.  या प्रकरणात येत असलेल्या ट्रकचालक मोहम्मद हनीफ वय वर्ष ५८  याच्याविरुद्ध वृत्तलेखनापर्यंत पुढील कारवाई सुरू होती.  हा दारू साठा नेमका  कुठून आला  आणि कोठे नेण्यात येणार होता याचा तपास सुरू असून अवैध दारू विक्रीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

 

Exit mobile version