वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावखेडा शिवारातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलीसांनी पकडले असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या सावखेडा शिवारातील बिबा नगर परिसरातून बेकायदेशीर अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी मिळाली त्यानुसार गुरूवार ५ मे रोजी दुपारी मिळाली नुसार विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची चोरी वाहतूक करतांना आढळून आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ लिलाधर महाजन, हरीलाल पाटील, संजय भालेराव, तुषार जोशी आणि चालक अशोक महाजन यांनी कारवाई करत ट्रक्टर जप्त केले. याप्रकरणी पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक अनिल उर्फ येशुनाथ पितांबर सोनवणे (वय-४०) रा. खेडी ता.जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

 

Protected Content