Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ६,३५० प्रकरणे निकाली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपूर्व अशी एकूण ६,३५० प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले असून या माध्यमातून त्या माध्यमातून एकूण ६२, ५१,०३,१७२ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली.

आज शनिवार, दि. ०७ मे २०२२ रोजी जळगांव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार आयोग, सहकार न्यायालय येथे ना. ना.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे न्यायालयातील प्रत्नोंवत व बादपूर्व अशी एकूण ५६,४३४ तडजोड पात्र प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

सर्व न्यायाधीश वृंद, वकील, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजूचे पक्षकार यांच्या मदतीने ५,५२३ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत ८२७ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्या माध्यमातून एकूण ६२, ५१,०३,१७२ / – रक्कम रुपये वसूल करण्यात आली. कौटुंबिक न्यायालयाचे १० प्रकरणे व जिल्हयात स्पेशल ड्राईव्ह मार्फत २२४ प्रकरणे, व जिल्हयातील प्रलंबित सर्व पोलीस चलान चे शेकडोच्या संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली.

कौटुंबिक न्यायालयाच्या १० प्रकरणे व जिल्हयात स्पेशल ड्राईव्ह मार्फत २२४ प्रकरणे व जिल्हयातील प्रलंबित सर्व पोलीस चलान शेकडोच्या संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे अध्यक्ष आणि तथा प्रमुख जळगांव जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलाणी,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगावचे सचिव ए.ए.के.शेख, जिल्हा वकिल संघ जळगावचे अध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा वकिल संघ जळगावचे उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, जिल्हा वकिल संघाचे सचिव दर्शन देशमुख आणि जिल्हा वकिल संघाचे सर्व सदस्य, जिल्हा सरकारी अभियोक्ता केतन ढाके, पॅनल न्यायाधीश आर.एन.हिवसे, जिल्हा न्यायाधीश १ व्हि.बी.बोहरा तदर्थ जिल्हा न्यायधीश ३ व्हि.व्हि.मुगळीकर, मुख्य न्यायदंडाधिकारी व्हि.जी.चौखंडे दिवाणी न्यायाधीश व स्तर भुसावळ, श्रीमती पी.ए.श्रीराम, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, आर.वाय.खंडारे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर, तसेच दिलीप बोरसे जिल्हा वकिल संघ, जळगावचे अध्यक्ष, जिल्हा वकिल संध जळगावचे उपाध्यक्ष प्रभाकर पाटील मुख्य न्यायदंडाधिकारी व्हि.कि.मुगळीकर, दिवाणी न्यायाधीश जी.चौखंडे, स्तर भुसावळ, श्रीमती पी.ए.श्रीराम, ७ थे सह न्यायाधीश श.क.सार, आर.वाय.खंडारे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, तसेच अँड. शरद न्यायये, अँड. महिमा मिश्रा, अँड. हाशिम खाटीक, अॅड बी.जी.कापुरे, अॅड विजय दोंड, अॅड. सी.आर.सपके, अॅड. योगेश जे. पाटील, अॅड. एस.एच.निकम, अॅड.बावीस्कर, अॅड. लिना म्हस्के, अॅड. संदीप जी. पाटील, तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक, रविंद्र एस. ठाकुर, व कर्मचारी अविनाश कुळकर्णी, प्रमोद पाटील, प्रमोद ठाकरे, निंबोळकर, चंद्रवदन भारंबे, प्रकाश काजळे, भालचंद्र सैंदाणे, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समांतर विधी सहाय्यक आरिफ पटेल, जावेद एस पटेल, आदींनी लोक अदालत यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Exit mobile version