Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात आज ४९ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवाल जिल्ह्यात एकुण ४९ कोरोना पॉझिटीव्ह आढळले असून आज २७ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. आज पाच तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहेत.

आजची आकडेवारी 

जळगाव शहर- १८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-५, अमळनेर-०, चोपडा-२, पाचोरा-१, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-२, एरंडोल-०,  जामनेर-०, रावेर-१, पारोळा-९, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर-१, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ४९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५७ हजार ४३८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ७०६ रूग्ण कोरोनामुक्त झाली असून ३६८ रूग्ण उपचार घेत आहे. आज जळगाव शहरातील दोन रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version