दुचाकींची चोरी करणारा चोरटा एलसीबीच्या जाळ्यात; चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणारे दोन जण निष्पन्न झाले असून एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोरा तालुक्यातील शहापूर येथून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयिताला पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दिपक सुनिल खरे (वय-२२) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, पहूर पोलीस ठाणे आणि पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांनी दाखल गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्यात. दरम्यान पाचोरा तालुक्यातील शहापूर येथील दोन तरूण कामधंदा न करता मौजमजा करण्यासाठी दुचाकीची चोरी करत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ सुनिल दामोदरे, दिपक पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, चालक अशोक पाटील, मुरलीधर बारी यांनी आज ९ सप्टेंबर रोजी दुपारी शहापूर ता. पाचोरा येथून संशयित आरोपी दिपक सुनिल खरे (वय-२२) याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता मित्र शुभम राजेंद्र परदेशी रा. शहापूर ता. पाचोरा यांच्यासह दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दरम्यान शुभम परदेशीला पोलीसांचा सुगावा लागल्याने तो फरार झाला. दिपक खरे यांने चोरीच्या तीन दुचाकी काढून दिले आहे. पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content