शेंदुर्णी येथील कॉटन जीनिंगला भीषण आग !

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील नर्मदा कॉटन जिनिंगच्या गोडावूनला शॉर्टसर्कीटमुळेल भिषण आग लागली. या आगीत सुमारे ३० ते ३५ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक रमेशचंद्र अग्रवाल (वय-४३) रा. सेंधवा ता. बडवानी मध्यप्रदेश ह.मु. शेंदुर्णी ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे शेंदुर्णी शिवारातील गट नंबर ५२० येथे कृष्ण उद्योगच्या अंतर्गत नर्मदा कॉटन इंडस्ट्रीट जिनिंगचे दोन गोडाऊन आहे. या ठिकाणी त्यांनी १९० क्विंटल वजनाचे कापसाची रुई ठेवण्यात आले होते. शनिवारी ७ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्यामुळे एकूण १९० क्विंटल वजनाची कापसाचे रूई जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एकूण ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जामनेर नगरपालिकेचा बंब घटनास्थळी बोलावण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी रविवारी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरनारे करीत आहे.

Protected Content