ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात कोरोना लसीकरण शिबीर

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात (दि.११) मंगळवार रोजी १५ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंध लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिबीराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक डी.व्हि. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांनी कोरोना काळातील नियमांचे पालन व लसीकरणाचे महत्त्व  विद्यार्थ्यांना पटवून दिले. महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी कामिनी इसाळगे, सुनिता मुंडे, योगिता ठाकुर, नैना नारखेडे, मनिषा महाजन, दिपाली महाजन, दिशा शिंदे यांनी काम पाहिले. एन. बी. पालवे, प्रतिभा लोहार, वर्षा राणे, एम. एस नेमाडे, पुनम कोल्हे, तृष्णा तळेले, आर.एन. तडवी, एस.एल भोळे, ए.एन पाटील, एस. एच. बाविस्कर, बी.डी.झोपे, पराग राणे, अनिल शिवदे, चंदन खरे, अशोक तायडे यांनी शिबीर प्रसंगी सहकार्य केले. २००विद्यार्थ्यांनी लसीकरण शिबीराचा लाभ घेतला.

 

 

Protected Content