Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची छबी कैद

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या सीमेवर जंगलामध्ये काल ६ रोजी यावल प्रादेशिक वन विभाग यांनी लावलेल्या लावलेल्या उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाची छबी कैद झाल्याची माहिती वन विभागाकडून प्राप्त झाली आहे.

१७५.५८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या यावल अभयारण्याची वन आणि वन्यजीव संपदा कधीकाळी जगभरात दखलपात्र होती. मेळघाट ते अनेर डॅम या नैसर्गिक टायगर कॉरिडॉर असल्याने कोरोना काळातही यावल अभयारण्यामध्ये २०२१ मध्ये वाघ आढळून आला आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये असलेला वाघ हा नर आहे कि मादी आणि याचे साधारण वय किती असू शकते याची माहिती लवकरच उपलब्ध होईल. अशी माहिती यावल उप वनसंरक्षक जमीर शेख यांनी दिली‌ आहे.

Exit mobile version