Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस ठाण्यासमोर तरुणाच्या डोक्यात घातला दगड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | किरकोळ वादावरून समजविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर घडली. याप्रकरणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील शिरसोली रोडवरील डीमार्ट समोर सईद शहा सलीम शहा हा आपल्या परिवारासह राहतो. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सईद शहा हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्यासमोर किरकोळ वाद समजवण्यासाठी गेला असता त्याला खलील शहा गुलाब शहा, आसिफ शहा लतिफ शहा, अरबाज शहा लतिफ शहा आणि समीर शहा खलिल शहा सर्व रा. फुकटपुरा, जळगाव या चौघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या समोर सईद शहाला शिवीगाळ करून बेदम मारहाण करून जखमी केले.

यासंदर्भात सोमवारी ५ सप्टेंब रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.

Exit mobile version