Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव क्रुझरने दुचाकीस्वाराला उडविले; तरूण जागीच ठार

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।पारोळा ते कजगाव रोडवरील पाटील कॉलेज जवळ समोरून येणाऱ्या क्रुझरे जोरदार धडक दिल्याने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात क्रुझरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. महेश राजेंद्र जावरे वय 24 रा. दिगर ता. पारोळा असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा ते कजगाव रोडवरील डी.पी. पाटील कॉलेज समोरून महेश राजेंद्र जावरे (वय-२४) हा तरूण दुचाकी (एमएच १९ बीयू २२०३) ने पारोळा कडून कजगावकडे जात जात असताना समोरून येणाऱ्या क्रुझर क्रमांक (एमएच ११ बीएच ४१६६) ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार महेश जावरे याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर क्रुझर चालका वाहन घेऊन पसार झाला होता. या घटने प्रकरणी अखेर बुधवारी ६ डिसेंबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण पारधी करीत आहे.

Exit mobile version