Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव कार ईलेक्ट्रीक पोलवर आदळली

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर दारूच्या नशेत कारचालवून परिस्थीतीकडे दुर्लक्ष केल्याने ईलेक्ट्रीक पोलवर अदळून अपघात झाल्याची घटना सोमवारी २० नोव्हेंबर रेाजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगरकडून वरणगावकडे जाणारी कार क्रमांक (एमएच १९ सीएक्स २२३) वरील चालक अकलाद अहमद रा. भुसावळ हा दारूच्या नशेत कार चालवत होता. सोमवारी २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अकलाद अहमद हा दारूच्या नशेत असल्याने त्याचा कारवरील ताबा सुटल्याने भरधाव कार ही राष्ट्रीय महामार्गाच्या डिवायडरील ईलेक्ट्रीक पोलला जोरदार धडक दिल्याची घटना भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ घडली आहे. या अपघातात ईलेक्ट्रीक पोल वाकला गेला. हा घटनेबाबत भुषण संजय कुंभार रा. साकेगाव ता. भुसावळ याने वरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार कारवरील चालक अकलाद अहमद याच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नवीद अली सैय्यद करीत आहे.

Exit mobile version