Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर शहरात रंगली कुस्त्यांची दंगल !

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शेर-ए-हिंद टिपु सुल्तान आखाड्याच्या वतीने कुस्त्यांची दंगल अतिशय उत्साहात पार पडली.

फैजपूर येथील मधुकरराव चौधरी स्टेडियम मध्ये कुस्त्यांची स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या दंगलीत मालेगाव, येवला, खंडवा, बर्‍हाणपुर, महाराष्ट्र सह मध्य प्रदेश, हरियाणा येथील पैलवानांनी मैदान गाजवले. मानाची कुस्ती मालेगाव येथील सैफ अली पैलवान यांनी मारली
याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जगन सोनवणे व फैजपुरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुरबान यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डायमंड स्कूलचे अध्यक्ष हाजी हारुन सेठ, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, फैजपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, ए एस आय मैनुद्दीन सैय्यद,दोस्तांना पंपचे संचालक हमीद शेख, इलियास सर, कलीम मन्यार, आरीफ भाई, अनवर खाटीक,अँड नितीन भावसार,अमजद सेठ, जावेद जनाब, इरफान सेठ, रियाज मेंबर, मुदस्सर नज़र ,शरीफ तडवी, भुपेंद्र सोनवणे, गुड्डू मेंबर, रियाज भाई, उपस्थित होते.

मॅच रेफरी म्हणून रिटायर्ड पोलीस शकील शेख व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नासीर होते. या कुस्त्यांचे आयोजन आवेश भांजा, अख्तर पैलवान, फारुक शेख, वसीम जनाब, शेख आसिफ,कामील पैलवान, निसार तडवी, इस्माईल शेख,बुरहान तडवी यांनी केले होते. तर, सुत्रसंचलन हाजी खलील यांनी केले.

Exit mobile version