Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खामगावात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा संदर्भात आढावा बैठक

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर २०२२ दरम्यान महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रनेता हे राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा म्हणून राबविण्यात येणार असून यासंदर्भात आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.

येथील विश्राम भावनांवर आयोजित या बैठकीला उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव तहसीलदार अतुल पाटोळे मुख्याधिकारी अकोटकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजपूत वैद्यकीय अधीक्षक डॉ. टापरे सह सर्व शासकीय विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीला संबोधित करताना आमदारांनी जनतेच्या प्रलंबित तक्रारी, समस्या सोडविण्यात याव्यात. पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांची योग्य माहिती देऊन लाभ मिळवून देण्यात यावा. ही सर्व कामे या सेवा पंधरवड्यात विशेष अभियान राबवून यशस्वीपणे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

 

 

Exit mobile version