Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथील सुभाष चौकातील रेस्टॉरन्ट दुकान फोडले; २५ हजाराची रोकड लांबविली

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील सुभाष चौकातील धनजी रेस्टॉरन्ट दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून २५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवाशी भरत डिगंबर चौधरी (वय-३५) रा. गणेश कॉलनी, फैजपूर यांचे गावातील सुभाष चौकातील धनजी रेस्टॉरन्ट नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे भरत चौधरी यांनी १ सप्टेंबर रोजी रात्री साडे नऊ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. २ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरला लावलेले कुलूप तोडले. दुकानात आत प्रवेश केल्यानंतर दुकानातील गल्ल्यातून २५ हजार रूपयांची रोकड चोरून नेले. हा प्रकार सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुधवाल्याच्या लक्षात आल्याने प्रकार उघडकीला आला. चोरी झाल्याची माहिती फैजपूर पोलीसांना देण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस  निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. भरत चौधरी यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उमेश चौधरी करीत आहे. 

Exit mobile version