Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘आयत पोयत सख्यानं’ फेम हास्यसम्राट प्रविण माळी यांची कळमसरे येथे भेट

अमळनेर (प्रतिनिधी) कळमसरे येथील माळी समाजाचे तरुण लेखक भुषण अशोक महाजन यांच्या राहत्या घरी ‘आयतं पोयतं सख्यान’चे हास्य सम्राट प्रविण माळी यांनी आज भेट दिली.
भुषण महाजन यांनी इतिहासातील प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळातील इतिहासाची साधने कोणती आहेत, याबाबत बरीचशी माहीती संग्रहीत केली आहे. त्यांनी अनेक इतिहास संदर्भात पुस्तके लिखाण केले असून अनेक आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले आहेत. त्यांच्या इतिहास कालीन संदर्भ ग्रंथ व माहितीचा केलेला संग्रह उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन प्रविण माळी यांनी यावेळी सांगितले.

मारवड येथील ए.पी.आय. समाधान पाटील यांनी सांगितले की, ज्या वयात मुले शिक्षण घेतात त्या वयात आपण केलेले लिखाण, व जमवलेली इतिहासकालीन माहीत उल्लेखनीय आहे. आपली भविष्यातील वाटचालीत अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.

कळमसरे येथील माळी समाजाचे युवा लेखक भुषण महाजन यांनी आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात इतिहास विषयावर विषयातील चर्चासत्रांमध्ये शोधनिबंध सुद्धा सादर केलेले आहेत त्यांचा अनेक मान्यवरांकडून सत्कारही करण्यात आलेला आहे त्यांच्या कामाबद्दल कळमसरे येथे माळी समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार सुद्धा झालेला आहे. ते कळमसरे येथील आदर्श शेतकरी अशोक महाजन यांचे चिरंजीव आहेत. यावेळी भूषण महाजन यांनी आतापर्यंत इतिहासाच्या संदर्भातील जमवलेली माहिती लिहिलेली पुस्तके भविष्यकालीन योजना या संदर्भातली माहिती हास्य सम्राट प्रवीण माळी मारवाडचे ए.पी.आय समाधान पाटील यांना दिली. ए.पी.आय. समाधान पाटील यांनी अहिराणी हास्यसम्राट प्रवीण माळी यांना पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला.

Exit mobile version