Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. भोळे यांच्या प्रराचार्थ आज शिवजी नगर येथे जाहीर सभा

rajumama bhole

जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार आ.सुरेश भोळे यांच्या प्रचारार्थ शिवाजी नगर येथे आज सायंकाळी भव्य जाहीर सभेचे  आयोजन करण्यात आले आहे. या सभेला गुजरात मधील भाजपचे खासदार सी. आर. पाटील, खासदार उन्मेष पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

आमदार सुरेश दामू भोळे यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दि.१८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ८ वाजता शिवाजी नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर होणार आहे. यासभेप्रसंगी गुजरात येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार सी. आर. पाटील, जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील, प्रदेश चिटणीस आ. स्मिता वाघ, हे या सभेला संबोधित करणार आहेत. तरी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शौचे, मंडल अध्यक्ष राजेंद्र मराठे, नगरसेवक, नगरसेविका प्रिया जोहरे, सरिता नेरकर, दिलीप पोकळे, रुक्सानबी खान, कांचन सोनवणे, नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, प्रभाग समिती सदस्य बंटी नेरपगारे, मनोज भांडारकर, जगदीश नेवे, मंडल पदाधिकारी संजय शिंदे, सुशील भावसार, नरेंद्र पिठ्वे, निलेश पवार, संजय सोनवणे, विठ्ठल पांगारे, पूनम खैरनार, युसुफ खान, सना जहांगीर खान, ज्योतीताई राजपूर, विनय निंबाडकर, जयेश भावसार, प्रभाकर तायडे, योगेश पाटील, दिनेश पुरोहित यांनी केले आहे.

Exit mobile version