Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा (व्हिडीओ)

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथे  रामायणकार महर्षी  वाल्मिकी ऋषी यांची जयंती कोळी समाजातर्फे मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढून साजरी करण्यात आली.

 

आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीपासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.  त्यानंतर नगरपालिका चौकामध्ये महर्षी वाल्मिकी ऋषी यांची आरती करून प्रतिमापूजन व अभिवादन करण्यात आले.  यावेळी आमदार रमेश कोळी, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरपालिका गटनेचे डॉ. प्रशांत भोडे, नगरसेवक प्रा. शरद पाटील, उल्हास पाटील, अतीश झाल्टे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी जितेंद्र पाटील, नवल पाटील, पाळधी माजी सरपंच कमलाकर पाटील, राष्ट्रवादी नेते संजय  गरुड, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अरुण राठोड, संदीप सरताळे, पंढरीनाथ वाघ, संतोष कोळी, विनोद कोळी, दिनेश वाघ यांच्यासह जामनेर शहर व तालुक्यातील कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version