Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट कागदपत्राने महिलेच्या नावावरील प्लॉटची विक्री ; भावासह वहिनीवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मनियार लॉ कॉलेज येथे राहणाऱ्या एका महिला यांचा एमआयडीसीत नावे असलेला प्लॉट हा खोटी पावर ऑफ ॲटर्नीचे बनावट दस्तावेज करून २ जणांना विक्री केल्याचा खळबळजनक  प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार ६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक असे की, मंजुदेवी लिच्छिराम छाजेड (वय-५७) रा. मण्यार लॉ कॉलेज, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंजूदेवी छाजेड आणि त्यांची वहिनी मंजूदेवी अशोककुमार बुच्‍चा यांच्या  नावावर एमआयडीसी वसाहतमध्ये एम सेक्टर मधील प्लॉट नंबर २११ येथे १५०० स्क्वेअर मीटर जागा आहे. दरम्यान त्यांची वहिनी मंजूदेवी अशोक कुमार बुच्चा आणि त्यांचा भाऊ अशोककुमार मोतीलाल बुच्चा दोन्ही रा. गंधर्व कॉलनी, जळगाव यांनी संगणमताने खोटी पावर ऑफ अटर्नीचे बनावट दस्तावेज तयार करून हा प्लॉट सुहास विश्वनाथ मुळे व अमोल विश्वनाथ मुळे यांना परस्पर विक्री केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी मंजुदेवी छाजेड यांनी बुधवारी ६  डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोघांविरोधात तक्रार दिली आहे.  त्यानुसार दिलेल्या तक्रारीवरून मंजुदेवी अशोक कुमार बुच्चा आणि अशोककुमार मोतीलाल बुच्चा दोन्ही रा.गंधर्व कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Exit mobile version