Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाजवळ चालत्या प्रवाशी रिक्षाने घेतला पेट

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळ चालत्या प्रवाशी रिक्षाने पेट घेतल्याची घटना गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेवून ही आग विझविण्यात आली. तोपर्यंत प्रवाशी रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा येथील रेल्वे उड्डाणपुला जवळून गेलेल्या रस्त्यावर गुरूवारी १२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावातून पिंप्राळा येथे जात असलेल्या रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३४८८) ही प्रवाशी घेवून चालक जात होते. त्यावेळी अचानक रिक्षाने पेट घेतला. ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने रिक्षा रोडच्या बाजूला घेवून रिक्षा थांबविली. त्यानंतर क्षणातच रिक्षाने मोठा पेट घेतला. यात संपुर्ण रिक्षा जळून खाक झाली आहे. ही आग कोणत्या कारणामुळे लागली यांची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान काही वेळानंतर महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथकातील युसुफ पटेल, भारत बारी, रविंद्र बोरसे आणि तेजस जोशी यांनी बंबासह घटनास्थळी दाखल झाले व आग विझविण्यात आली. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version