Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा येथे प्रांताधिकारी निवासस्थान बांधकामाचे भूमीपूजन

पाचोरा प्रतिनिधी । भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन आज १२ रोजी सकाळी ११ वाजता आमदार किशोर पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.

 

पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ. किशोर पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तात्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे (पाटील) यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन आज दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता आमदार किशोर पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार, ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती. यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला.

 

शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती. त्याची दखल घेत आ. किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.  भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील,  माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, प्रविण ब्राह्मणे, सुमित सावंत, आबा कुमावत, एकनाथ पाटील हे उपस्थित होते.

 

 

पाचोऱ्यात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवारा असावा तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे.

 

-किशोर अप्पा पाटील ,आमदर पाचोरा- भडगाव

Exit mobile version