Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विहीरीतुन पाणी काढतांना नऊ वर्षीय मुलीचा पाय घसरुन दुदैवी मृत्यु

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील लालमाती येथे विहीरीतुन पाणी काढतांना नऊ वर्षीय मुलीचा पाय घसरुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की रमेश बारेला,सुरली बारेला, मनिषा बारेला,रेणु बारेला रा लालमाती यांच्या घरापासुन थोड्या अंतरावर असलेल्या दगडु सिताराम चव्हाण यांचे शेतगट नंबर २९ मधील विहीरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता काही वेळाने काली बारेला,मनिषा बारेला, रेणु बारेला या रडत घरी आल्या व त्यांनी सांगितले की, सुरलीबाई रमेश बारेला ही विहीरीतुन पाणी काढीत असतांना विहीरीत पाय घसरुन पडली याची माहिती घरच्यांना दिली.यावेळी अल्लाउद्दीन तडवी गाव पोलीस पाटील राजु तडवी व गावातील इतर लोक असे विहीरीजवळ जावुन अल्लाउद्दीन तडवी याने विहीरीत उतरुन त्यांची नात सुरलीबाइ रमेश बारेला हीला लोकांच्या मदतीने विहीरी बाहेर काढले व रावेर ग्रामीण रुग्णालय
रावेर येथे घेवुन आलो असता डाँक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मयत घोषित केली. याबाबत रावेर पोलिसात अकास्मत मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version