Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निकालापूर्वीचं विजयी मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

sanjay kadam1

रत्नागिरी वृत्तसंस्था । विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली असून रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम यांनी निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढल्याने त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर संजय कदम यांचे काही समर्थक खेड येथे जमा झाला. त्यानंतर त्यांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र तरीही ही मिरवणूक बंद न करता ती सुरु होती. यामुळे संजय कदम यांच्यावर पोलीस चांगलेच संतापले. त्यांनी ताबडतोब ही मिरवणूक रद्द करायला लावली. मात्र त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर संजय कदम यांनी ही मिरवणूक पुन्हा सुरु केली. दरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत संजय कदम यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय कदम यांच्यासह त्यांची पत्नी सायली कदम यांच्यावरही खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version