Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१२ ऑक्टोंबरला ८० हजार कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

भुसावळ प्रतिनिधी । येत्या १२ ऑक्टोंबरपासून आयुध निर्माणी भुसावळसह देशातील ४१ आयुध निर्माणींचे जवळपास ८० हजार कर्मचारी देशव्यापी अनिश्चित कालिन संपावर जात असून आयुध निर्माणी भुसावळ संयुक्त कृती समितीव्दारे अभियान राबविण्यात येत आहेत.

या संपात कायदा व सुव्यवस्था तसेच शांततेचे पालन व्हावे, म्हणून आज रोजी जळगाव जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्या सोबत गोपनीय विभागाचे प्रमोद चौधरी, राजेश बोदडे यांनी आयुध निर्माणी संयुक्त कृती समिती सोबत शांतता बैठक घेतली आणि त्यामध्ये कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून आंदोलन शांततेत केले जाईल असे संयुक्त कृती समितीतर्फे सांगण्यात आले.

बैठकीत अधिकाऱ्यांनी होणाऱ्या संपा संदर्भात सर्व माहिती जाणून घेतली. संप का करीत आहेत ? संप किती काळ चालेल? संपात कोण -कोण सहभागी होईल? संपात कायदा व सुव्यवस्थेचे कसे पालन करण्यात येणार?  या विषयी विचारणा केली असून हा संप संपूर्ण भारत भर केला जाणार आहे. यामध्ये ८० हजार कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारी संस्था,भारत सरकारचे उपक्रम आबादि-आदिनीला सरार्सपणे विकत आहेत.तसेच खाजगीकरण करीत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये असंतोषाची लाट पसरलेली आहे.त्यातूनच हा संप होत आहे.कारण जर आयुध निर्माणीचे खाजगीकरण झाले तर हा संरक्षणाचा प्रश्न राहील. देशाच्या संरक्षणाचा प्रश्न राहील म्हणून सरकारने आपला जो निर्णय मागे घ्यावा.अन्यथा संप तीव्र केला जाईल असे संयुक्त कृती समिती भुसावळ तर्फे कळविण्यात आले. 

संपामध्ये ८० हजार कर्मचाऱ्यांचा प्रश्न नसून त्यांच्या सोबत १ लाख कॉन्ट्रॅक्टर व लेबर आमच्यावर निर्भय आहेत असे जवळ-जवळ २ लाख कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे.या बैठकीत दिनेश राजगिरे, लक्ष्मण वाघ, कैलास राजपूत, नवल भिडे, के.पी.चौधरी, एस.एस. राऊत असे पदाधिकारी यांच्या सोबत बैठक संपन्न झाली.

Exit mobile version