Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंदु बहीणीला रक्तदान करुन मुस्लिम भावाने वाचविले प्राण !

देशातील धर्मांध शक्तीला चपराक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । “तु हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा, “इंसान की औलाद है, इंसान बनेगा” या ”धुल का फुल” या चित्रपटातील गीतातील ओळी सत्यात उतरले ते पाचोऱ्यातील एका मुस्लिम युवकाने हिंदू बहीणीला रक्तदाना केल्याच्या प्रसंगातुन सद्यस्थितीला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतिक असल्याचा प्रत्यय आज पहायला मिळाला आहे.

 

फाळणी नंतर पुन्हा आम्ही आपसात भांडत राहीलो ते थेट कोरोना महामारीपर्यंत पुन्हा हे दोन वर्षे कुठे ही हिंदू – मुस्लिम वाद ऐकावयास मिळाला नाही. त्यांनतर पुन्हा राजकीय भांडवल म्हणून सोयीचा जातीयवाद पुढे आले. अशा परीस्थितीत पाचोरा शहरातील डॉ. वैभव सुर्यवंशी यांच्या लिलावती हॉस्पिटल मध्ये आशा तुके नावाच्या महिलेचे एका शस्त्रक्रियेसाठी ए.बी. पॉझिटिव्ह रक्ताची अंत्यत गरज असतांना ही बाब कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांना आशा तुके यांचे नातेवाईकांनी कळविली असता सचिन सोमवंशी यांनी त्यांच्या कॉंग्रेस इंजिनिअरिंग सेलचे अध्यक्ष रहीम रमजान शेख या सिव्हिल इंजिनिअर असलेल्या युवकास निरोप देताच हा युवक रक्तदानासाठी आला.

 

रक्तदान केल्यावर आशा तुके या महिलेला जीवदान मिळाले खरे मात्र या घटनेने धर्मा च्या अगोदर माणुसकी किती महत्वाची आहे याचा प्रत्यय आला. देशात चाललेल्या जातीयवादी राजकारणाला ही एक चपराक म्हणावी लागेल. आजही आम्ही एकच आहोत हा जणु संदेश मिळत आहे.  सदर मुस्लिम युवकाने रक्तदान केल्याने आशा तुके या हिंदु बहीणीला जीवनदान मिळाले. या घटनेनंतर मात्र सन – १९५९ मध्ये गाजलेला चित्रपट धुल का फुल मधील गितकार साहीर लुधियानवी यांनी लिहिलेल्या तु हिंदु बनेगा न मुसलमान बनेगा.. “इंसान की औलाद है, इन्सान बनेगा” याचा प्रत्यय आला. रक्तदानासाठी स्वतः हुन पुढे या आपल्या रक्तदाना ने एकाला जीवनदान मिळते म्हणून रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आव्हान केले आहे. आशा तुके यांच्या नातेवाईकांनी रहीम शेख या युवका सह कॉंग्रेसचे सचिन सोमवंशी यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version