Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोबाईल दुकानदाराला दोन जणांकडून चॉपरने वार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात राहणाऱ्या एकाला मोबाईल दुकानदाराला दोन जणांनी चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुमित वसंतलाल वलबानी (वय-३१) रा. सिंधी कॉलनी, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मोबाईल दुकान लावून आपला उदरनिर्वाह करत असतो. मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सुमित बलबानी हा त्याच्या घरासमोर उभा होता. रात्रीच्या वेळेस कॉलनीत दोन फिरत होते. त्यावेळी विनाकारण काय फिरता असे सुमितने विचारले.

याचा राग आल्याने संशयित आरोपी आर्यन पवार रा. शनिपेठ आणि नामिर खान या दोन जणांनी चॉपरने वार करून सुमितला जखमी केले. हा प्रकार घडल्यानंतर सुमितला तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सुमित वलबानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.

Exit mobile version