Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील जावळे गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी २१ एप्रिल रोजी पहाटे ३.३० वाजता उघडकीला आले. यासंदर्भात सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील जावळे गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २१ एप्रिल रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी सोमवारी २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र साळुंखे हे करीत आहे.

Exit mobile version