Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना  उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दुकानावर जात असल्याचे अल्पवयीन मुलगी सांगून गेली. दरम्यान, ती घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र मुलगी मिळाली नाही. त्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने तिचा फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यानुसार  रविवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Exit mobile version