Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील हादगाव येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हातगाव गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवार १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पीडित मुलगी घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान पीडित मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बुधवारी १३ मार्च रोजी दुपारी १ वाजता पिडीत मुलीच्या पालकांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे करीत आहे.

Exit mobile version