Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातून एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. याप्रकरणी शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील तांबापूरा परिसरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारासा पिडीत अल्पवयीन मुलगी ही घरी असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अखेर शनिवारी ३० डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन हे करीत आहे.

Exit mobile version