Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अश्लिल चाळे करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एक गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एप्रिल २०२३ मध्ये गावात राहणारा रमाकांत संतोष वाघ याने पिडीत मुलीसह तिच्या आजीला अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर पिडीत मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने आजीसह पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी रमाकांत संतोष वाघ यांच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.

Exit mobile version