Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील अल्पवयीन मुलीला तरुणाने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात १४ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. ६ सप्टेंबर रोजी मुलगी घरी असतांना अचानक गायब झाली. सर्वत्र शोध घेवूनही मुलगी मिळून आली नाही. कुटुंबियांनी शोध घेतला, त्यांच्या मुलीला रामेश्वर कॉलनीतच राहणाऱ्या मनोहर शिवदास राठोड या तरुणाने पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. अखेर मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन मनोहर राठोड यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अनीस शेख हे करीत आहेत.

Exit mobile version